Uncategorized • क्राईम • ताज्या घडामोडी • पुणे • शिरूर

एक चुकीची ओळख अन् गोळीबारात कामगाराचा अंत; पोलिसांनी पाच जणांना ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव midc पोलीस ठाणे हद्दीतील कारेगाव येथील साईनगर परिसरात पाणी प्रक्रिया प्लॅन्टमध्ये काम करणारे हामजा उस्मान शेख (वय ३९) या व्यक्तीचा गोळी झाडून खून केल्याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे खुनाच्या कटाचा उलगडा झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास नवले यांच्या प्लॅन्टमध्ये हामजा शेख हे कामगार म्हणून कार्यरत होते. पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सार्थक संदेश कोहोकडे (वय २४, कारेगाव, ता. शिरूर, पुणे या), तुषार अजय तोडकर (वय २६, र. पेठ, ता. आंबेगाव, पुणे ), संतोष मधुकर मांजरे (वय ३७, मांजरेवस्ती, ता. खेड,,पुणे ), विठ्ठल नवनाथ पिकळे (वय २७, रा. कारेगाव, ता.शिरूर, पुणे ) आणि योगेश विलास इडोळे (वय २८, रा. शुक्रवार पेठ, वाशिम, ता.वाशिम, वाशिम ) यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी खुनाचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणातील पवन सुरेश हंडोरे आणि पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव या दोघांनी विकास नवले समजून हमजा उस्मान शेख याचा गोळी झाडून खून करण्यात आला आहे. या प्रकरणातील वरील पाच आरोपींना अटक करण्यात आले असून पवन हुंडारे, पृथ्वी उर्फ भैय्या दत्तू जाधव हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिक्षक रवींद्र भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, स्था. गु.शा. चे सपोनी महादेव शेलार, रांजणगाव पो स्टे सपोनी अनिल मोरडे, स्था. गु.शा.चे पोसई महेश डोंगरे, रांजणगाव पो स्टे चे पोसई निळकंठ तिडके, पोसई थोरात, पोसई दत्त शिंदे, स्था. गु.शा. चे पोलिस अंमलदार शरद बांबळे, संजय पड्याळ, दीपक साबळे, तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमिन, विकास पाटील, सागर धुमाळ, संदीप फड,स्वप्नील गढवे, हनुमंत ढोबळे, संदीप वार्ड, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, अतुल डेरे, चेतन पाटील, भारत मोहोळ व रांजणगाव पो स्टे चे अंमलदार विलास आंबेकर, उमेश कुतवळ, योगेश गुंड, रासकर, शिवणकर, संतोष साळुंखे, दत्तात्रय शिंदे, खेड पो स्टे चे पोलिस अंमलदार संकेत कवडे यांनी केली असून पुढील तपास रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

error: Copying content is not allowed!!!