Uncategorized

शिरूर तालुक्यात संतापाची लाट; चिमुरडीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीविरुद्ध कारवाई

शिरूर : शिरूर तालुक्यातील कारेगाव परिसरातील म्हसोबानगर येथे पाच वर्षांच्या चिमुरडीशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध रांजणगाव एम आय डी सी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास संबंधित चिमुरडी शेजारील घराजवळ खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने तिला घरात नेऊन तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिमुरडीच्या कुटुंबीयांनी तातडीने मदत मिळवण्यासाठी ११२ क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.

या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करणे महत्त्वाचे आहे.

error: Copying content is not allowed!!!