खेड जुन्नर ताज्या घडामोडी शिरूर संपादकीय

‘The बातमी’चा पहिला दीपावली विशेषांक प्रकाशित

पुणे | गेल्या काही महिन्यांपूर्वी ग्रामीण भागातील तसेच राज्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे त्याचबरोबर शेती, मातीशी नाळ जोडलेल्या The बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्मची लोकप्रियता लक्षात घेता केवळ वेबवर कार्यरत न राहता वाचकांच्या आग्रहाखातर ‘दीपावली विशेषांक’ची निर्मिती करण्यात आली आहे. या The बातमी दीपावली विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच अभिनेते, शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठी साहित्यातील मोठमोठ्या लेखकांसह ग्रामीण भागातील लेखक शेतकरी पुत्रांच्या लेखणीतून उतरलेला हा दीपावली विशेषांक सर्व प्रकारच्या वाचकांना तृप्त करणारा आहे. विशेष म्हणजे या अंकात जाहिरातींची कुठेही गर्दी पाहायला मिळणार नाही. केवळ वाचक डोळ्यासमोर ठेऊन बनवलेल्या दीपावली विशेषांकाचे कौतुक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

ग्रामीण भागात देखील वाचन संस्कृती रुजवावी या हेतूने संपादक टीमने प्रत्येक लेखाचे केलेले संकलन अत्यंत बोलके आहे. त्यामुळे आवर्जून दीपावली अंक वाचण्याचा सल्ला डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. यावेळी लेखक, वाचक, जाहिरातदार, पत्रकार यांचे आभार मानण्यात आले.

अंकातील लेखकाच्या हस्ते प्रकाशन करावं या हेतूने त्याचबरोबर उत्तर पुणे जिल्ह्याच्या मराठी मातीची अस्मिता जपणारे प्रसिद्ध अभिनेते म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

2 Comments

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!