राजकीय

महाराष्ट्राच्या नवीन राजकारणा विषयी राहुल गांधींना माहिती दिली – संजय राऊत

नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी देशातील नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील शंभर खासदारांना नाश्त्यासाठी बोलावलं होतं त्यावेळी संजय राऊत देखील उपस्थित होते. राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली त्यात राऊत यांनी गांधींना महाराष्ट्रातील नवीन राजकारणा विषयी माहिती दिली असल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान राहुल गांधी गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात आलेले नाही ते लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले. यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणाली विषयी त्याचबरोबर महाराष्ट्रात शिवसेना ही एवढी मोठी संघटना कशी उभी केली याबाबत देखील चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. महाविकस आघाडी सरकार टिकाव ही राहुल गांधी यांची ईच्छा आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा संदर्भात चर्चा झाली, देशातील विरोधी पक्ष हे कमालीचे एकजूट आहेत. असही बोलताना ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये काही दिवसांपासून अंतर्गत वाद असल्याचे दिसून येत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महापालिका निवडणूक काँग्रेसनं लढवल्यास महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची घेतलेली भेटीमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

शिवसेना आता अधिकृतपणे काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) भाग झाली आहे का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही देशहिताच्या विषयांवर विरोधकांसोबत ठामपणे उभे आहोत. मात्र आम्ही यूपीएचे भाग नाही. आम्ही आमची स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवली आहे, असे राऊत म्हणाले.
मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधींनी विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दिल्लीतल्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये सर्व विरोधी पक्षांना नाश्त्यासाठी बोलावलं होतं. तत्पूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली. यावरही राऊत यांनी भाष्य केले.

1 Comment

Click here to post a comment

  • जहाल व मवाळ मतवादी दोन दिगग्ज एकत्र

Featured

error: Copying content is not allowed!!!