खेड ताज्या घडामोडी राजकीय शिरूर

संजय राऊत मोहितेंवर आक्रमक तर पवारांबाबत मवाळ भूमिका.

पुणे | राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी तीन पक्ष एकत्र करून महाविकास आघाडीला जन्म देणारे खासदार संजय राऊत दोन दिवस शिरूर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. आयोजित कार्यकर्ता मेळावामध्ये खेड आणि शिरूरचे लोकप्रतिनिधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कसा त्रास देतात याचा पाढा स्थानिक शिवसैनिकांनी खासदार राऊत यांच्यासमोर वाचला.

पोलिस प्रशासनाचा वापर करून खोटे गुन्हे दाखल करणे, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत शिवसैनिकांना त्रास देणे, शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या संस्था ताब्यात घेण्यासाठी दबावाचा वापर करणे अशा प्रकारच्या अनेक तक्रारींचा पाढा खेड आणि शिक्रापूरच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी ऐकून घेतला.

खेड पंचायत समितीच्या सभापती पदाच्या अविश्वास ठरावावरून झालेले राजकारण, शिवसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे आणि अटक याचा समाचार राऊत यांनी चांगलाच घेतला. तुरुंगवास भोगलेल्या प्रत्येक दिवसाचा हिशोब घेतला जाईल. या सगळ्याची नोंद करून ठेवली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि इकडची दुनिया तिकडे होईल पण खेडचा पुढचा आमदार हा सेनेचाच असणार असं राऊत यांनी ठणकावून सांगितले तर शिरूरच्या लोकप्रतिनिधी बाबत तक्रारी ऐकूनही राऊत यांनी मवाळ भूमिका घेत राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे, सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा सल्ला दिला. काहीही झालं तरी पुढचा संसार आपल्याला एकत्र करायचा आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी सय्यम राखला पाहिजे.
त्याचबरोबर रडून चालणार नाही ठणकावून सांगा सरकार आपलं आहे, असा सल्ला राऊत यांनी शिवसैनिकांना दिला.

गुन्हे मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार

चासकमानचे हक्काचे पाणी मिळवण्यासाठी जातेगाव खुर्द, करंदी, शिक्रापूर, या भागातील शेतकरी गेल्या वर्षी आक्रमक झाले होते त्यामुळे पाण्यासाठी शिरूरच्या पूर्व आणि पश्चिम भागाचा वाद निर्माण झाला होता, त्यावेळी पूर्व भागातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्यात शिवसैनिकांनी हिरहिरीने भाग घेतला होता मात्र हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला असल्याचा आरोप देखील त्यावेळी शिवसैनिकांनी केला होता. त्याचबरोबर समाधान डोके, नितीन दरेकर यांच्यासह ६५ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याबाबत हे गुन्हे मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सूतोवाच खासदार संजय राऊत यांनी शिक्रापूर येथील कार्यक्रमात केले.

1 Comment

Click here to post a comment

  • Tumhi fkt bolnar baki kahi karat nahi Aj kendur zhale tyaberober Dhamari zhale pabal .ase khup mothi gaon panyapasun vanchit ahe 2.5 years आंदोलन केले pan fkt sagle bole kru ajun paryant ka kele nahi amchyakde korda dhushkal padat ahe Pan 3 years hot ale chas che pani yeil ani dimbhe che yeil hec calu ahe

Featured

error: Copying content is not allowed!!!