आंबेगाव खेड जुन्नर ताज्या घडामोडी पुणे राजकीय

बैलगाडा शर्यतीवर आठ दिवसांत पुन्हा आंदोलन, आमदार पडळकरांचा खेडमध्ये इशारा

खेड, पुणे – सांगली जिल्ह्यातील झरे गावात राज्य सरकारला गुंगारा देऊन गनिमीकावा करत बैलगाडा शर्यत आंदोलन यशस्वी करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुणे जिल्ह्यातील खेड येथे बैलगाडा मालकांशी बोलताना येत्या आठ दिवसांत पुन्हा आंदोलन करू, तुम्ही साथ द्या अशी साद बैलगाडा मालकांना घातली आहे.
जुन्नर तालुक्यातील नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आशा बुचके यांनी जुन्नर तालुक्यात भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला जाताना रस्त्यात खेड येथे बैलगाडा मालकांची भेट आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, बैलगाडा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयसिंग एरंडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शांताराम भोसले त्याचबरोबर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान नारायणगाव येथे बैलगाडा मालकांनी मोठ्या उत्साहात आमदार पडळकरांना घोडीवर बसवून मोठ्या उत्साहात स्वागत केले.


दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यतीवर भविष्यात आंदोलन करण्याचे भाष्य केले होते. त्याचबरोबर आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील खेड तालुक्यात येऊन बैलगाडा मालकांना येत्या आठ दिवसांत आंदोलन करण्यासाठी साथ देण्याची साद घातल्याने पुन्हा बैलगाडा शर्यतीच्या आंदोलनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्याने या भागातील बैलगाडा मालक काय भूमिका घेतात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

error: Copying content is not allowed!!!