ताज्या घडामोडी पुणे पुणे शहर महाराष्ट्र

गुरुवार पासून पुण्यात रंगणार 15 वा वसंतोत्सव…

 

पुणे प्रतिनिधी :15 वा वसंतोत्सव गुरुवारपासून सुरू होणार आहे. 20 ते 23 जानेवारी या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच येथे हा महोत्सव पार पडेल. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 50 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत वसंतोत्सवाचे आयोजन केले जाते. सुरुवातीला नयन घोष आणि ईशान घोष यांचे सतार आणि तबला आणि सुब्रमण्यम यांचे युगलगीत आणि समूहाचे सादरीकरण होईल. शनिवारी चित्रपट अभिनेते नाना पाटेकर व काडगावकर यांचा टॉक शो असेल.
अखेरच्या सादरीकरणात ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या शीर्षकाखाली हलके संगीत सादर होईल. यामध्ये राहुल देशपांडे, दीप्ती माटे, संजय दास, ओजस अधिया, मिलिंद कुलकर्णी, अनय गाडगीळ, अभिजित बधे आणि मनीष कुलकर्णी यांचे सादरीकरण अनुभवता येईल.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!