Uncategorized

नात्याला काळिमा फासणारी घटना | पित्याकडून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार…!

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १४ वर्षांच्या पोटच्या मुलीवर बापानेच अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पित्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, लांडे वस्ती, रांजणगाव गणपती येथील आरोपी पिता यांनी पोटच्या मुलीला एकटी असताना अश्लील कृत्य करत शारीरिक छळ केला. त्यावेळी मुलीने विरोध करत “पप्पा, असं काय करता?” अशी विचारणा केली असता, आरोपीने तिला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर, आरोपीने दोघींनाही धमकावत, “तुम्हा दोघींना माझ्याशिवाय कोणी नाही, तुम्हाला मारून टाकेन,” असे म्हणत पुन्हा धमकी दिली.

या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे करत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून समाजमन हादरवणारा आहे. पोलिसांकडून लवकरात लवकर आरोपीवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Featured

error: Copying content is not allowed!!!