Uncategorized

शिरुर तालुक्यातील गावनिहाय सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर !

शिरुर : तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे. या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग व सर्वसाधारण गट अशा विविध गटांमध्ये सरपंच पदे आरक्षित करण्यात आली आहेत. एकूण ८ अनुसूचित जाती, ३ अनुसूचित जमाती, २६ नागरिकांचा मागास प्रवर्ग, तसेच सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण गट अशा पद्धतीने आरक्षणाचे वितरण झाले आहे.


शिरुर तालुका सरपंच आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे :

अनुसूचित जाती महिला – मुखई, निमगाव म्हाळुंगी, वढू बु, जांबुत


अनुसूचित जाती सर्वसाधारण – आमदाबाद, गोलेगाव, हिवरे, वाजेवाडी


अनुसूचित जमाती महिला – वडगाव रासाई, माळवाडी,


अनुसूचित जमाती सर्वसाधारण – कुरुळी


नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – चव्हाणवाडी, करडे, म्हसे बु, पिंपरी दुमाला, वाडा पुनर्वसन, सदलगाव, पिंपळे जगताप, निमगाव भोगी, पिंपळसुटी, रावडेवाडी, नागरगाव, बाभुळसर बु, आलेगाव पागा.
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण – कासारी, शरदवाडी, अण्णापुर, वाघाळे, परोडी, खंडाळे, फाकटे, कवठे य, अंधळगाव, कान्हूर मेसाई, कारेगाव, मिडगुलवाडी, कोळगाव डोळस.

सर्वसाधारण महिला – आंबळे, कळवंतवाडी, धानोरे, शिंदोडी, निमगाव दुडे, केंदूर, विठ्ठलवाडी, पिंपरखेड, गणेगाव दुमाला, बुरुंजवाडी, कोंढापुरी, टाकळी भिमा, चिंचोली मोराची, गुनाट, उरळगाव, शिक्रापूर, निर्वी, कोरेगाव भीमा, दरेकरवाडी, आपटी, न्हावरा, पाबळ, धामारी, जातेगाव बुद्रुक, डिंग्रजवाडी, खैरेनगर, मोटेवाडी, वरुडे, निमोणे, तरडोबाचीवाडी.


सर्वसाधारण – भाबार्डे, डोकसांगवी, चिंचणी, शिरूर ग्रामीण, काठापुर, वडनेर खुर्द, शिरसगाव काटा, टाकळी हाजी, चांडोह, करंदी, रांजणगाव सांडस, तांदळी, करडेलवाडी, मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, सोने सांगवी, दहिवडी, सणसवाडी, मलठण, रांजणगाव गणपती, बाभुळसर खुर्द, सविंदणे, सरदवाडी, इनामगाव , खैरेवाडी, जातेगाव खुर्द, गणेगाव खालसा, करंजावणे, पिंपळे खालसा.

या सोडतीमुळे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व गटांना प्रतिनिधित्व मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांच्या राजकीय हालचालींना गती मिळणार असून नवीन नेतृत्व उदयाला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Featured

error: Copying content is not allowed!!!