Uncategorized क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर

आई यात माझा काय दोष ? छोट्याश्या चिमुकल्याची केली आईनेच हत्या !

शिरूर : शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा स्वतःच्या आईने खून केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र अशोक पवार (वय ३६, रा. भांबर्डे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. मात्र आरोपी पूजा पवार हिने आपल्या ११ महिन्यांच्या मुलगा यश रवींद्र पवार याचा घरासमोरील सिमेंट ओट्यावर डोके आपटून खून केल्याची कबुली दिली आहे. मुलगा सतत रडत असल्याने तसेच वैयक्तिक कारणांमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या घटनेनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी पूजाने सिमेंट ओट्यावरील रक्त पाण्याने धुऊन टाकले. त्यानंतर मृतदेह कपड्यांच्या बॅगेत भरून बॅगमध्ये दोन दगड ठेवून ती शेतातील विहिरीत फेकून दिली. याच अनुषंगाने ५ एप्रिल २०२६ रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सखोल तपासादरम्यान संशयित आईकडे चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली रांजणगाव पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी आरोपी म्हणून पूजा रवींद्र पवार (रा. भांबर्डे, ता.शिरूर, जि.पुणे ) हिला अटक करण्यात आली आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करीत असून आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!