प महाराष्ट्र पुणे

पुणे विभागातील 17 लाख 54 हजार 865 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे, दि. 27 : पुणे विभागातील 17 लाख 54 हजार 865 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 33 हजार 368 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 781 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 37 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.72 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 79 हजार 781 रुग्णांपैकी 10 लाख 51 हजार 750 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 876 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.40 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 14 हजार 657 रुग्णांपैकी 2 लाख 692 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 808 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 73 हजार 999 रुग्णांपैकी 1 लाख 66 हजार 138 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 334 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 527 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 71 हजार 99 रुग्णांपैकी 1 लाख 58 हजार 38 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 530 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 531 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 93 हजार 832 रुग्णांपैकी 1 लाख 78 हजार 247 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 233 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 352 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 713 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 718, सातारा जिल्ह्यात 586, सोलापूर जिल्ह्यात 361, सांगली जिल्ह्यात 693 तर कोल्हापूर जिल्ह्यात 355 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 901 आहे. पुणे जिल्हयामध्ये 834, सातारा जिल्हयामध्ये 253, सोलापूर जिल्हयामध्ये 450, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 21 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 343 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 25 लाख 817 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 33 हजार 368 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

error: Copying content is not allowed!!!