ताज्या घडामोडी महाराष्ट्र

त्यावेळी पंतप्रधानांनी माझ्या विनंतीने दौरा रद्द केला होता – शरद पवार !

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे नुकसानग्रस्त भागासाठी मदत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान एकूण 16 हजार कुटुंबांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे मदत केली जाणार आहे. 250 डॉक्टरांची तुकडी पुरग्रस्त भागातील नागरिकांची तपासणी करेल, त्याचबरोबर त्यांना योग्य ती औषधे पुरवण्यात येणार असल्याचं देखील शरद पवारांनी सांगितले.
पत्रकार परिषदेच्या दरम्यान शरद पवार यांनी किल्लारी भुकंपाची आठवण करून दिली यामध्ये पत्रकार परिषदेच्यावेळी शरद पवारांनी पुरग्रस्त भागाचे दौरे टाळण्याचं आवाहन राजकीय पक्षांच्या नेत्यांना केलं.

नुकसानग्रस्त भागात शासकिय यंत्रणा काम करण्यात व्यस्त असतात. नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी दौरे केल्यानं शासकिय यंत्रणांचं लक्ष विचलित होतं. त्यामुळे नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचे दौरे टाळायला हवे, असं आवाहन शरद पवारांनी केले आहे. यावेळी पवारांनी लातूरमध्ये झालेल्या किल्लारीचा भूकंपाचा संदर्भ देत एका घटनेची आठवण करून दिली.

मी लातूरला असताना आम्ही सर्वजण कामात होतो. त्यावेळी पंतप्रधान लातूरमध्ये येणार होते. मी पंतप्रधानांना सांगितलं की, पुढचे किमान 10 दिवस तरी या भागात येऊ नका. तुम्ही आलात तर सर्व यंत्रणा तिकडे लावावी लागेल. त्यांनी लगेच माझी विनंती मान्य करून त्यावेळचा दौरा रद्द करून. ते 10 दिवसानंतर आले. दरम्यान मी सुद्धा दौऱ्यावर जात नाही. त्यामुळे सगळी यंत्रणा फिरवावी लागते, असही शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान, सप्टेंबर 1993 साली किल्लारी गावात मोठा भुकंप आला होता. त्या भुकंपाने लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्याला हादरवून टाकलं होतं. या भूकंपात एकूण साडेतीन हजारहुन अधिक जणांचा मृत्यु झाला होता. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या कार्यकाळात किल्लारीचं पुनर्वसन केलं होतं.राज्य सरकार नुकसानग्रस्त लोकांना संपूर्ण मदत करणार असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!