Uncategorized क्राईम

मांजरी येथील खून प्रकरणात गुन्हे शाखा युनिट-६ ची मोठी कारवाई !

पुणे (प्रतिनिधी) :  पुणे जिल्ह्यातील मांजरी स्मशानभुमी येथील परिसरात विकास सोनवणे याचा जुन्या भांडणाच्या व उसन्या पैशाच्या कारणावरुन कोयत्याने सपासप वार करून तसेच दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.यात मुख्य आरोपी हेमंत मोरे व त्याच्या साथीदारांच्या मदतीने खून केल्यानंतर आरोपी फरार झाले होते.मात्र युनिट-६ च्या गुन्हे शाखा पथकाने २४ तासाच्या आत चारही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.१ ऑगस्ट रोजी विकास सोनवणे याचा खुन हेंमत मोरे व त्याचे साथीदारांनी खून केलेला असुन ते केसनंद गावचे दिशेने एका चारचाकी गाडीमधुन जात आहेत,अशी माहिती गुन्हे शाखा युनिट-६ च्या पोलिसांना मिळाली.त्यानंतर केसनंद व लोणीकंद या दिशेने पोलिसांनी चारचाकीचा पाठलाग करून खंडोबा माळ लोणीकंद येथे सदर गाडी थांबवली असता गाडीतून बाहेर पडुन आरोपी हे पळुन जात असताना शुभम अशोक गायकवाड (वय २३ वर्षे ),अभिजित ऊर्फ नाना सुखराज महाले ( वय २३ वर्षे ), हेमंत किसन मोरे ( वय ३१ वर्षे),गोविंद बाबासाहेब बनसोडे (वय २६ वर्षे, सर्व रा. शिवशंभोनगर संतोषी माता मंदिराजवळ, मांजरी खुर्द ता. हवेली जि. पुणे) या चार आरोपींना युनिट-६ च्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना जेरबंद केले.याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता,पोलीस सह आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर श्रीनिवास घाडगे,सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर, लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सपोनि नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, तांत्रिक विश्लेषण विभागाचे सलीम तांबोळी यांचे पथकाने केली.

error: Copying content is not allowed!!!