क्राईम ताज्या घडामोडी पुणे

शेंबडं पोर देखील सांगेन हा आवाज संजय राठोडचा – चित्रा वाघ

पुणे– पुणे पोलिसांच्या हाती पूजा चव्हाण प्रकरणी महत्वाचा पुरावा लागला आहे आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यात फोनवरुन संभाषण झालं होतं. या सर्व संभाषणांचं रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलं आहे. त्यातील आवाज हा संजय राठोड यांचा आहे हे शेंबडं पोर देखील सांगेल ते शोधून काढायला काही रॉकेट सायन्सची गरज नाही असं वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे.

पूजाच्या मोबाइलमध्ये सापडलेल्या या संभाषणांमधील एक संभाषण ९० मिनिटं चाललं होतं अशी सूत्रांची माहिती आहे. पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला पुण्यात इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येसाठी शिवसेनेचे यवतमाळमधील आमदार संजय राठोड यांना जबाबदार धरलं जात असून यामुळे २८ फेब्रुवारीला त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामादेखील द्यावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे.

प्राथमिकदृष्ट्या फोनमधील संभाषणावरुन समोरील व्यक्ती संजय राठोडच असल्याचं दिसत आहे. तिने आपली सर्व संभाषणं रेकॉर्ड केली होती. हे संभाषण बंजारा भाषेत झालं असल्याने भाषांतर करुन घेत आहोत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. संजय राठोड आणि पूजा चव्हाण दोघेही एकाच आदिवासी बंजारा समाजातून होते. मूळ बीडची असणारी पूजा शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. आत्महत्येनंतर तिच्यात आणि संजय राठोड यांच्यात संबंध असल्याचा आरोप झाला आहे.

तसेच आत्महत्येच्या २४ तास आधीचं यवतमाळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळवलं असून फॉरेन्सिकसाठी पाठवलं आहे. फुटेजमध्ये पूजा राठोड ही संजय राठोड यांचा निकटवर्तीय अरुण राठोडसोबत दिसत आहे. अरुण आणि संजय राठोड यांचा अजून एक सहकारी विलास चव्हाण हे पूजासोबत पुण्यातील मोहम्मदवाडी येथील हेवन पार्कमध्ये एका भाड्याच्या घरात राहत होते. तिथेच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण लागले आहे.

error: Copying content is not allowed!!!