राजगुरूनगर – खेड तालुक्यातील दहा गावे झिका विषाणू संसर्ग बाबत अतिसंवेदनशील म्हणून आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली आहेत यामध्ये राजगुरुनगर शहरासह तालुक्यातील इतर लहान मोठ्या गावांचाही समावेश करण्यात आला आहे. झीका डेंगी व चिकनगुनिया सदृश्य आजार असल्याने तालुक्यातील मागील तीन वर्षात सातत्याने डेंगी व चिकनगुनिया या आजारांचा उद्रेक झालेल्या गावांचा झिका संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी श्री गाढवे यांनी दिली
झिका विषाणू संसर्ग बाबत अतिसंवेदनशील गावे..
राजगुरूनगर, पांडुरंगनगर, शिरोली, आळंदी, मरकळ, भोसे, निघोजे, मोई, मेदनकवाडी व गोसासी या गावांचा समावेश करण्यात आला आहे
झिका विषाणूच्या धर्तीवर खेड तालुक्यातील आरोग्य यंत्रणा दिवस रात्र कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे.. तालुक्यात डेंग्यू सदृश परिस्थिती पाहता ग्रामपंचायत व आरोग्य सेवकांच्या मार्फत डेंग्यू व इतर विषाणू संदर्भात जनजागृती केली जात असून अतिसंवेदनशील गावांमध्ये दिवसातून दोनदा धूर फवारणी, आठवड्यातुन एक कोरडा दिवस पाळणे, भारित कीटकनाशक मच्छर दाणी वाटप, सांडपाणी व गटारे वाहती करणे, खड्डे बुजवणे, योग्य ठिकाणी गप्पी मासे सोडणे असे प्रतिबंधात्मक उपाय राबवले जात आहेत…
शेलपिंपळगाव आरोग्य केंद्राच्या हद्दीतील भोसे आणि मरकळ या उपकेंद्राची तातडीने बैठक घेऊन योग्य सूचना देण्यात आल्या असून शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, मोहितेवाडी, भोसे रासे, मरकळ या हद्दीत डेंग्यु सदृश्य रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येते असल्याने नागरिकांनी लक्षणे दिसतास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे..
डॉ इंदिरा पारखे (आरोग्य अधिकारी शेलपिंपळगाव)
Add Comment