आंबेगाव खेड ताज्या घडामोडी

पैसे द्या दर्शन घ्या, भिमाशंकर येथील धक्कादायक प्रकार

भिमाशंकर – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने अद्याप सर्वच मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे पैसे घेऊन दर्शन देण्याचा प्रकार समोर आला आहे.
नुकताच श्रावण महिना सुरू होतोय त्यामुळे भिमाशंकर मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक भागातून भाविक येत आहेत, मात्र राज्य सरकारच्या आदेशानुसार मंदिर अद्याप बंद आहे. परंतु भाविकांकडून पैसे घेऊन मंदिरात दर्शनासाठी सोडत असल्याचा धक्कादायक आरोप भाविकांनी केला आहे. भिमाशंकर देवस्थानच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी अडवतात आणि हजार – पाचशे रुपये घेऊन मगच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देतात अन्यथा प्रवेश नाकारला जातो. एवढच नव्हे तर भाविक, पुजारांना आणि पुढाऱ्यांना फोन लावून प्रवेश मिळवण्यासाठी राजकीय दाबावाचाही वापर करत आहेत. अशी माहिती बंदोबस्तसाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र अशा गंभीर प्रकारची प्रशासन दखल घेऊन कोणती कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आम्ही पूर्णपणे मंदिर बंद ठेवलेले आहे मात्र असा काही प्रकार घडला असेल तर यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल – सुरेश कौदरे (अध्यक्ष – भिमाशंकर देवस्थान)

error: Copying content is not allowed!!!