ताज्या घडामोडी पुणे शिरूर

वाबळेवाडी शाळेचा अहवाल सादर.

शिरूर, पुणे | वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विध्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पाच ते पंचवीस हजार रुपये रोख स्वरूपात रक्कम शाळा सुधार निधीच्या नावाखाली घेतली जात होती मात्र ती रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात जमा करण्याऐवजी खाजगी व्यक्तीच्या नावे जमा करत असल्याचे समोर आले होते.

वाबळेवाडीची शाळा देशात नावाजलेली आहे. या शाळेचे
मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. मात्र या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार होत होता. स्थानिक विध्यार्थ्यांना प्रवेश टाळला जात होता त्यामुळे जिल्हा परिषदेकडे अनेक पालकांनी लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुका गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी आर्थिक व्यवहारात अनियमितता समोर आली असल्याचा अहवाल दिला होता.

त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळेतील प्रशासकीय अर्थिक आणि अभिलेखांच्या सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पाच सदस्यीय जिल्हास्तरीय समिती स्थापन केली होती. त्याच समितीच्या अहवालाचा मोठा गठ्ठा एका बंद पेटीत आयुष प्रसाद यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली आहे.

दरम्यान या बंद पेटीत आणि एवढ्या मोठ्या गठ्ठ्यात नेमका काय अहवाल सादर करण्यात आला आहे याची माहिती अद्याप मिळू शकली नाही, लवकरच याची माहिती समोर येईल आणि वाबळेवाडी शाळेच्या संदर्भातील तक्रारीमध्ये नेमकं काय तथ्य आहे हे समोर येणार आहे.

error: Copying content is not allowed!!!