आंबेगाव खेड जुन्नर ताज्या घडामोडी पुणे राजकीय शिरूर संपादकीय हवेली

बराक ओबामालाही सरस ठरले डॉ. अमोल कोल्हे.

शिरूर, पुणे | हिम्मत असेल तर दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांनी माझ्या विरोधात लढावे दस्तुरखुद्द शरद पवार जरी समोर उभे राहिले तरी मीच निवडून येईल. एवढच काय ओबामा आले आणि निवडणुकीला उभे राहिले तरी मीच जिंकणार. अशा प्रकारचे वक्तव्य तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मोडीत काढून डॉ. अमोल कोल्हे शिरूर लोकसभेच्या रिंगणात उतरून आढळराव पाटील यांचा पराभव केल्याने बराक ओबामालाही डॉ. कोल्हे सरस ठरले असल्याच्या उपहासात्मक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

पूर्वीचा खेड आणि आत्ताचा शिरूर लोकसभा मतदार संघ शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या हातात जाऊ न देता पंधरा वर्षे मतदानाचा चढता आलेख ठेवत लोकसभेत नेतृत्व केले. आमदार राष्ट्रवादीचे आणि खासदार शिवसेनेचा अशा प्रकारचे समीकरणच शिरूर लोकसभा मतदार संघात बऱ्यापैकी पहायला मिळत होते. मात्र शरद पवारांच्या जिल्ह्यात पंधरा वर्षे शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणे ही गोष्ट आढळराव पाटील यांची नेहमीच मान उंचावत होती. परंतु हीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात खटकत होती. जाहीर सभेत राष्ट्रवादीचे नेते मतदारांना सवाल करत होते की ‘राष्ट्रवादीचं नेमकं चुकतय कुठं’ ?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान भोसरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विलास लांडे पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे मतदारांनी जवळपास निश्चित केले होते, मात्र अचानक शिवसेनेचे उपनेते, प्रचारवक्ते, संपर्क प्रमुख राहिलेले डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभेच्या रिंगणात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले.

‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारल्याने आणि छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास टेलिव्हिजनच्या माध्यमातून जनतेसमोर आणल्याने घराघरात पोहचलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविला त्यामुळे बराक ओबामालाही डॉ. अमोल कोल्हे सरस ठरले असल्याच्या चर्चा मतदार संघात रंगू लागल्या होत्या.

डॉ. अमोल कोल्हे हे खासदार म्हणून नेमकी कोणती कामे करावी याची ओळख सातत्याने जनतेला करून देत असतात. मतदार संघात डॉ. कोल्हे यांचा वावर कमी असला तरी सभागृहात त्यांनी पहिल्याच दमात संसदरत्न खासदार म्हणून ठसा उमटवला आहे. पुणे – नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाचा पाठपुरावा, पुणे – नाशिक महामार्ग प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी पाठपुरावा, रिंगरोड संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडणे, पुणे – अहमदनगर रस्त्याचा नव्याने होणारा विकास याबाबत पाठपुरावा, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठीचा पाठपुरावा, बहुचर्चित इंद्रायणी मेडिसीटी प्रकल्पाची संकल्पना अशा अनेक विकास कामांसाठी अग्रेसर राहून शिरूर लोकसभा मतदार संघाचा विकास करू पाहणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसा निमित्त The बातमी कडून खूप साऱ्या शुभेच्छा….

error: Copying content is not allowed!!!