कोल्हापूर’ची अपूर्वा नानिवडेकर सिंह हिचे मराठीत व्हर्जन…!
टीम द बातमी :- अगदी काही दिवसांपूर्वी एका संगीताची सर्वच रसिकांना भोवळ पडली आहे.श्रीलंकेतील योहानी नावाच्या एका गायिकेने ‘माणिके मागे हिथे’ हे गाणं गायलं व युट्युबवर तुफान व्हायरल झाले आहे.आतापर्यंत तब्बल १२.३० कोटी रसिकांनी हे गाणे पाहिले गेलेले आहे.या गाण्यावर अनेकजण रिल्स बनवत आहेत.केवळ इन्स्टाग्रामवर नाही तर फेसबुक ट्वीटरसह संपूर्ण सोशल मीडियावर या गाण्याची चर्चा आहे.मात्र आता ‘माणिके मागे हिथे’ या गाण्याचं मराठी व्हर्जन आले आहे.
कोल्हापूर नगरीची कलाकार अपूर्वा नानिवडेकर सिंह या गायिकेने मराठीत माणिकेचा तडका लावून रसिकांच्या मेजवणीत एक मराठी व्हर्जन ठेवलं आहे.हे एक प्रकारचं फ्युजनचं आहे. आत्तापर्यंत जवळ जवळ ११ हजार लोकांनी या मराठी व्हर्जनला बघितलं आहे. रसिकांनी तर यावर आपापल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत
Add Comment