शिरुर, पुणे | शिरुर येथील कोर्टामध्ये दोन महिलांवर एका अज्ञान इसमाने बंदुकीने गोळ्या झाडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाच्या परिसरात अचानक गोळीबार झाल्याने शिरुर शहर हादरले आहे.
शिरुर येथील कोर्टाच्या प्रवेश द्वाराजवळ ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोळ्या झाडणारा अज्ञात इसम फरार झाल्याची माहिती त्या ठिकाणच्या प्रथमदर्शनी लोकांनी दिली आहे. या दोन्ही महिला एकाच कुटुंबातील असल्याचे बोलले जात आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशा प्रकारे दिवसाढवळ्या दोन महिलांवर बंदुकीने गोळ्या झाडल्यामुळे संपूर्ण शिरुर तालुकात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आहे. पुढील उपचारासाठी शिरुर येथील हॉस्पिटलमध्ये या महिलांना नेण्यात आले आहे.
Add Comment