शिरूर, पुणे | बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर शिरूर लोकसभा मतदार संघात विविध भागात बैलगाडा मालकांसह शिवसैनिक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा जाहीर सत्कार करत आहेत. आढळराव पाटील यांनी बैलगाडा मालकांची बाजू सातत्याने संसदेत, उच्च न्यायालयात, राज्य सरकारकडे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात मांडल्याने अखेर बैलगाडा शर्यती सुरू झाल्या अशा भावना व्यक्त करत शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द येथे माजी सरपंच समाधान डोके यांनी आयोजित केलेल्या जाहीर नागरी सत्कार प्रसंगी आढळराव पाटील बोलत होते. त्यावेळी “गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माझ्यामध्ये २००३-०४ च्या दरम्यान तू विधानसभा आणि संधी मिळाली तर मी लोकसभा असं आमचं अलिखित ठरलं होतं” अशी माजी खासदार शिवजीराव आढळराव पाटील यांनी कबुली दिली.
यावेळी बैलगाडा शर्यतीचा जसा इतिहास आहे तसाच राजकीय इतिहास देखील असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन असताना शेतकऱ्यांशी संपर्क यायचा खेड, जुन्नर, आंबेगाव भागातील बैलगाडा मालकांचा हक्काचा माणूस म्हणून माझ्याकडे पाहिले जात असे. त्याकाळी सहकारी जयसिंग एरंडे यांच्यासह आम्ही बैलगाडा विमा कंपनी स्थापन केली. स्वखर्चाने बैलगाडा मालकांना प्रोत्साहन दिले. कारखान्याचे काम करत होतो दरम्यान शेतकरी, बैलगाडा मालकांशी संपर्क यायचा त्यामुळे तीन, चार तालुक्यातून लोकांनी डोक्यात भरवलं की, तुम्ही लोकसभा निवडणुक लढवली पाहिजे. दरम्यान राष्ट्रवादीने दिलेला शब्द पाळला नाही मला लोकसभेचं तिकीट नाकारलं. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुंबईत बोलावून लोकसभेची निवडणूक लढायला सांगितली आणि मी बैलगाडा मालकांच्या जीवावर निवडून आलो, निवडून आल्यानंतर तब्बल शंभर बैलगाडा घाट बनवले. अशा प्रकारच्या अनेक आठवणींना उजाळा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी दिला.
दादा पुन्हा खासदार होणार – सागर टाकळकर
दरम्यान या कार्यक्रमाला अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते. यावेळी खेड खरेदी विक्री संघाचे मॅनेजर नानासाहेब टाकळकर यांचे चिरंजीव सागर टाकळकर यांनी बैलगाडा मालकांच्या वतीने भावना व्यक्त करत असताना बैलगाडा शर्यत बंदच्या काळात आत्तापर्यंत घाटासाठी आम्ही बैलगाडा मालकांनी स्वखर्चातून लाखो रुपये खर्च केले आहेत. आम्ही आणखी दोन, तीन वर्षे थांबू दादा आपण पुन्हा खासदार झाल्यानंतर आमच्या घाटाच्या स्टेजसाठी निधी उपलब्ध करून द्या कारण आम्हाला खात्री आहे की, आपण २०२४ मध्ये पुन्हा खासदार होणार आहात. त्यावर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकटात प्रतिसाद दिला.
यावेळी अरुण गिरे, प्रकाश वाडेकर, सुधीर फराटे, रविंद्र गायकवाड, सोपान जाधव, पोपट शेलार, विकास मासळकर, अभिजित मासळकर, जयदीप ताठे, नितीन दरेकर, भाऊसाहेब थिटे, अविनाश साकोरे, वैभव ढोकले यांसह अनेक शिवसैनिक, बैलगाडा मालक, ग्रामस्थ उपस्थित होते
उचलली जीभ लावली टाळ्याला