मुंबई | महाविकास आघाडी सरकारने नुकताच दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात हा निर्णय मंत्रिमंडळात घेतला. या निर्णयावर देखील अनेक मतमतांतरे पाहायला मिळाली. त्याप्रमाणे आता मंत्र्यांच्या बांगल्यांना ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया तीव्र शब्दात नोंदविली आहे.
“मंत्र्याच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावं देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतलाय… निर्णयाचं स्वागत! पण… जर मंत्र्यानी जनतेची सेवा करण्यात कुचराई केली तर त्याच किल्ल्यावरून त्या मंत्र्यांचा कडेलोट करण्याचीही हिम्मत सरकारनं दाखवावी…”
मंत्र्याच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावं देण्याचा निर्णय #MVA सरकारनं घेतलाय… निर्णयाचं स्वागत!
पण…
जर मंत्र्यानी जनतेची सेवा करण्यात कुचराई केली तर त्याच किल्ल्यावरून त्या मंत्र्यांचा कडेलोट करण्याचीही हिम्मत सरकारनं दाखवावी… pic.twitter.com/LvPi3zRYlp— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 14, 2022
अशा आशयाचं ट्विट करून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे बाहेर पडत नसल्याने भाजप नेते मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत तर कार्यभार इतर मंत्र्यांकडे देण्याचा सल्ला देखील देत आहे. त्यामुळे सातत्याने महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमधील वाद पहायला मिळत आहे.
Add Comment