ताज्या घडामोडी देश पुणे महाराष्ट्र राजकीय

स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी जिंकलेलं ऑलिंपिक पदक देशाच्या खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रासाठी कायम प्रेरणास्त्रोत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १५ :- देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणारे, ऑलिंपिक मैदानावर, सातासमुद्रापार भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे मराठमोळे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

स्वर्गीय खाशाबा जाधव यांना अभिवादन करता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये प्रतिकूल परिस्थितीचा सामना आणि खडतर आव्हानांवर मात करुन कुस्तीतलं तसंच देशासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकलं. स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी जिंकलेलं ऑलिंपिक पदक आजही देशातील खेळाडू व क्रीडाक्षेत्रासाठी मुख्य प्रेरणास्त्रोत आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले, घडलेले आलिंपिकवीर पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव आणि हेलसिंकी ऑलिंपिक मैदानावरची त्यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी भावी पिढीला कायम प्रेरणा देत राहील, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!