पुणे | नुकतीच पुणे जिल्हा कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री यांनी दिले. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोडकळीस आलेले साकव उभारण्यासाठी ५ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली.
दरम्यान विविध गावातील कालव्यावरून शेतकऱ्यांना दळणवळणासाठी धोकादायक ठरू लागलेल्या आणि मोडकळीस आलेले साकव पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली होती. त्याला अनुसरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली जाईल अशी माहिती समितीला दिली. पहिला टप्पा खेड सुरू होईल त्याचबरोबर अस्तरीकरण देखील पहिल्या टप्प्यात खेडकडून सुरू होणार असल्याची माहिती आमदार मोहिते यांनी दिली.
पहिल्याच बैठकीत राजाभाऊंची गावासाठी निधीची मागणी
दरम्यान चासकमान कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी राजेंद्र ढोकले यांची वर्णी लागल्यानंतर ही पहिलीच समितीची बैठक पार पडली आहे. या पहिल्याच बैठकीत ढोकले यांनी करंदी (ता. शिरूर) येथील सोनावणे वस्ती याठिकाणी शेतकऱ्यांना पायी जाण्या – येण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत साकव उभारण्यात आला होता मात्र सद्या तो मोडकळीस आला आहे त्यामुळे तो दळणवळणासाठी धोकादायक ठरू लागला आहे. याची दखल घेऊन ढोकले यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा पक्का पूल बांधणी करण्यासाठी मागणी केली आहे.
रविवारी आवर्तन, पाण्याची परिस्थिती पाहून पाणी वाटप होणार
रविवारी (दि. १६) रोजी पाहिले आवर्तन सोडणार आहे शिवाय यावर्षी एकूण तीन आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाण्याची परिस्थिती पाहून पाणी वाटप होणार असल्याचे आमदार मोहिते यांनी सांगितले. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार मानसिंग पाचूंदकरउपस्थित होते.
Add Comment