ताज्या घडामोडी देश पुणे भोर महाराष्ट्र

“रायरेश्वर – हिंदवी स्वराज्य शपथभूमी” या विशेष टापालचे अनावरण

रायरेश्वर,भोर (18जानेवारी) :रायरेश्वर हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील विस्तीर्ण पठार भारतात महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पसरलेले आहे. याच मुऱ्हा-पठारावर श्री रायरेश्वराचे प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा असलेले शिवमंदिर आहे. शेकडो वर्षाची गुलामगिरी झुगारून हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी एप्रिल १६४५ ला येथेच त्यांच्या अठरापगड जातीतील सहकारी मावळ्यांसोबत त्या काळच्या परकीय जुलमी राजवटी विरोधात ‘हिंदवी स्वराज्य’ स्वतंत्र राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली होती. त्यामुळे या पवित्र ‘हिंदवी स्वराज्य शपथभूमी’ ला मराठ्यांच्या इतिहासात आणि एकुणातच भारत देशाच्या परंपरेत विशेष आदराचे स्थान आहे. अध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारस्या सोबत हि भूमी एक नैसर्गिक वारसा देखील आहे. विशेषत: पावसाळ्यात विविध रंगे-बेरंगी फुलांच्या ताटव्यांनी अक्षरश: हे पठार फुलते, जणू एखादे पुष्प पठार. भारत देशाच्या एका महत्वाच्या अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा असलेल्या रायरेश्वर या प्रेरणाभूमीला सन्मानित करण्यासाठी भारत सरकारच्या टपाल खात्याच्या माध्यमातून, श्री रायरेश्वर ग्रामथ संस्था व बायोस्फिअर्स संस्था यांच्या पुढाकाराने तसेच शिवप्रेमी, ग्रामपंचायत, रायरी आणि सहयोगी संस्था यांच्या सहकार्याने “रायरेश्वर – हिंदवी स्वराज्य शपथभूमी” या टपाल विशेष आवरणा चे प्रकाशन किल्ले रायरेश्वर ता. भोर येथे काल (दि.१७ रोजी) टपाल सेवा विभागाच्या संचालिका सिमरन कौर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, बायोस्फिअर्स चे अध्यक्ष व या विशेष आवरणाचे प्रस्तावक व संकल्पक डॉ. सचिन पुणेकर, महाराष्ट्र वनविभागाचे कार्य आयोजन चे मुख्य वनसंरक्षक नानासाहेब लडकत, श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय जंगम उपस्थित होते.

या प्रकाशन सोहळ्याला पुणे ग्रामीण डाकघर अधीक्षक प्रमोद भोसले, द.उपविभागीय सहा. अधीक्षक डाकघर भोर संजय भंडारी, शिवप्रेमी पराग शिळीमकर, सुनिल जंगम, समीर घोडेकर, सचिन देशमुख, सुनिल चिकणे, निलेश खरमळे, लहू किंद्रे, सखाराम जंगम, किशोर जंगम, शैलेंद्र पटेल, राजेश महांगरे, शाहू सावंत, स्वराज पुणेकर, प्रशांत शेटे, सुप्रिया पुणेकर, सुप्रिया शिळीमकर, निलम शेटे, सुवर्णा जंगम सह टपाल खाते सह वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी सह स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी उपस्थित होते. सुत्रसंचालन विठ्ठल दानवले यांनी व प्रास्ताविक डॉ. सचिन पुणेकर यांनी तर आभार रविंद्र जंगम यांनी मानले.

याप्रसंगी बोलताना सिमरन कौर म्हणाल्या की पौष पौर्णिमा, शाकंभरी नवरात्र व राजमाता जिजाऊ जयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी शपथ घेतलेल्या रायरेश्वर या पवित्र भूमीवर या विशेष टपालाचे प्रकाशन झाल्याने आनंद होत आहे. त्यामुळे या प्रेरणाभूमीची कीर्ती जगभर पोहोचणार आहे.

इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आदर्शवादी लोकराजे व प्रशासक आहेत. शिवरायांनी रायरेश्वरावरील शंभू महादेव मंदिरात वयाच्या १५ व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अठरापगड जातीच्या मावळ्यांना शिवरायांनी इथे स्वातंत्र्याचा महामंत्र दिला. शिवरायांच्या विश्ववंदनीय लोककल्याणकारी कार्याच्या स्मृतीनां विशेष टपाल पाकीटामुळे उजाळा मिळाला आहे.
यावेळी मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) हरीत चळवळी अंतर्गत शेती व पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या उपद्रवी विदेशी तणांची होळी करण्यात आली. श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मूळ वटवृक्षापासून तयार केलेल्या आणि श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संबधित मूळ अजानवृक्षांच्या रोपाचे पूजन आणि रोपण मंदिर परिसरात करण्यात आले. तसेच काळूराम धाडवे निर्मित भोर-वेल्हे पर्यटन विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि सुधीर तनपुरे निर्मित पक्षांच्या घरट्यांचे (बर्ड नेस्ट) मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण- निसर्गार्पण करण्यात आले….

error: Copying content is not allowed!!!