आंबेगाव खेड जुन्नर ताज्या घडामोडी देश प महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र मावळ शिरूर

ऊस उत्पादक शेतकरी हतबल, कारखाना प्रशासनाची डोळेझाक…!

खेड प्रतिनिधी : शाश्वत बाजारभाव मिळतो म्हणून नदीकाठच्या आणि कालव्याच्या जवळच्या शेतकऱ्यांनी ऊसाचे पिक घ्यायला सुरुवात केली खरी मात्र आता वर्षभर शेतात ऊस सांभाळून तोडणीच्या वेळी ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन व मुकादमाला विनवण्या करूनही वेळेवर ऊसतोड होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

ऊसतोड लांबल्याने उसाला तुरे आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. शेतकऱ्यांना ऊस उत्पादन सोयीचे आणि खात्रीशीर वाटू लागले असले तरी निश्चित बाजारभाव असल्याने दोन रुपये हातात येतील या आशेवर ऊस क्षेत्रात प्रचंड मोठी वाढ होत आहे. परिसरातून ४ सहकारी तर 2 खाजगी साखर कारखान्याची ऊस वाहतूक सुरू आहे. सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांचा ऊस वेळेत नेत नसल्याची ओरड शेतकरी करत आहेत. यंदाच्या हंगामात बहुतेक साखर कारखान्याकडे ऊस तोड मजूर कमी असल्यामुळे ऊस तोडणीस उशिर होत असला तरी मुकादम आणि वाहतूक दार पैशांची मागणी करून शेतकऱ्याला वेठीस धरत आहेत. शेतकरी शेतात तोड येण्यासाठी मुकादमाला जेवणावळीसह पैसे देत आहे तरीही ऊसतोड वेळेवर होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

हवामान बदला मुळे व ऊस तोडीला उशीर होत असल्याने उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले असून त्याचाही फटका शेतकऱ्याला बसत आहे, उसाला तुरा आला की ऊस आतून पोकळी निर्माण करतो. त्यामुळे उसाच्या वजनात मोठी घट होते आणि त्याचा फटका थेट उत्पन्नावर होतो त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे….

प्रत्येक साखर करखान्यांकडून नियमाप्रमाणे ऊसतोड सुरू असल्याचे सांगण्यात येते. मात्र ज्याचा वशिला त्याचाच ऊस कारखान्याला अशी परिस्थिती पाहायला मिळते. प्रत्येक सहकारी कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नसल्याची ग्वाही देत असला तरी शेतकरी खाजगी कारखान्याला ऊस देण्याच्या तयारीत आहेत. मात्र तिथेही वशिला कामी येत असल्याने सर्वसामान्य शेतकरी त्रासला गेला आहे…

ऊस पिकाची वेळेत तोडणी झाली तर शेतकऱ्याच्या उसाचे वजन घटत नाही. पुढची मेहनत करण्यास वेळ मिळून चलन खिशात पडण्यासाठी शेतकर्‍यांचा आटापिटा सुरू आहे. ऊस तोडणीसाठी ऊसतोड कामगारांचे मुकादम शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करून वेळेत ऊस तोडणी करत नाही. मुकादम खिसा गरम करण्यात मग्न आहे. याकडे कारखाना व्यवस्थापनाने लक्ष घालून ऊसतोड सुरळीत करण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकरी करत आहेत.

error: Copying content is not allowed!!!