पुणे प्रतिनिधी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना येरवडा येथील मनोरुग्णालयात अत्यंत गंभीर आजाराच्या उपचारासाठी त्वरित दाखल करून घेण्यात यावे यासाठी पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा व मारण्याची धमकी देणारे भाष्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांचे मानसिक संतुलन पूर्ण बिघडले असून त्यांना मानसोपचाराची अत्यंत निकडीची आवश्यकता आहे. त्यासाठी त्यांना येरवडा येथील मनोरुग्णालयात अत्यंत गंभीर आजाराच्या उपचारासाठी त्वरित दाखल करून घेण्यात यावे यासाठी पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि युवामोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या वेळी नाना पाटोले यांचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कडून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा शहर सरचिटणीस राजेश येनपूरे, सरचिटणीस प्रतीक देसर्डा, दिपक पवार, राजू परदेशी, अरविंद गोरे, ओंकार केदारी, स्वप्नील उंद्रे, अमित कंक, दुष्यंत मोहोळ, अपूर्व खाडे, धनंजय जाधव, संतोष खांदवे, संतोष राजगुरू, सचिन दांगट, संदीप काळे, पुनीत जोशी तसेच पुणे शहर भाजप युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाच्या पंतप्रधानांबद्दल जी भाषा वापरली आहे ती अत्यंत आक्षेपार्ह असून गुन्हेगारी पद्धतीची आहे असे जगदीश मुळीक यांनी सांगितले. मुळीक पुढे म्हणाले, पंतप्रधानांबद्दल भाष्य करताना प्रत्येक भारतीय नागरिकाने व्यवस्थित भाष्य केले पाहिजे. नाना पाटोले हे पुण्यात आल्यावर आम्ही त्यांचे वेगळ्या पद्धतीने स्वागत करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
पाटोले यांना येरवडा येथील मनोरुग्णालयात अत्यंत गंभीर आजाराच्या उपचारासाठी त्वरित दाखल करून घेण्यात यावे यासाठी त्यांच्या नावाचा अर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च भाजयुमो तर्फे करण्यात येईल असे राघवेंद्र मानकर यांनी सांगितले.
Add Comment