ताज्या घडामोडी देश पुणे महाराष्ट्र

त्या विकेट मुळे जसप्रीत बुमराहचा तीन वर्षांचा दुष्काळ हटला

दक्षिण आफ्रिका : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बुधवारी खेळला गेला. या सामन्यात भारताचा वेगवान गोललंदाज जसप्रीत बुमराह याने जानेमन मलान याची विकेट घेतली आणि सोबतच मागच्या तीन वर्षांचा दुष्काळ देखील संपवला. बुमराहने या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या आणि विरोधी संघाला २९६ धावसंख्येवर रोखले.
बुमहारने मलानची विकेट सामन्याच्या पावरप्लेमध्ये घेतल्यामुळे मागच्या तीन वर्षंपासून तो ज्या गोष्टीची वाट पाहत होता, ती साध्य झाली आहे. बुमराहने यापूर्वी २०१९ विश्वचषकादरम्यान पावर प्लेमध्ये एका खेळाडूची विकेट घेतली होती. त्यानंतर बराच काळ उलटून गेला होता, पण बुमराहला पावर प्लेमध्ये विकेट मात्र मिळत नव्हती. त्याने २०१९ विश्वचषकात उपांत्य सामन्याच्या पावर प्लेमध्ये त्याने शेवटची विकेट घेतली होती. या सामन्यात भारतासमोर न्यूझीलंड संघाचे आव्हान होते. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल याला बुमराहने बाद करून तंबूत पाठवले होते. त्यानंतर जवळपास तीन वर्षांचा कालावधी निघून गेला. या मधल्या काळात बुमराहने एकूण २३३ चेंडू टाकले आणि १७० धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा आणि न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने खेळले, पण एकाही सामन्याच्या पावर प्लेमध्ये त्याला विकेट मिळाली नव्हती.

error: Copying content is not allowed!!!