पुणे | संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१९-२० अंतर्गत पाणी व स्वच्छतेमध्ये पुणे जिह्यातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींची पडताळणी डिसेंबर २०२१ मध्ये करण्यात आली. यामध्ये पहिला क्रमांक खेड तालुक्यातील कान्हेवाडी तर्फे चाकण या ग्रामपंचायतने पटकाविला आहे. तर दुसरा क्रमांक जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी आणि तिसरा क्रमांक इंदापूर तालुक्यातील सपकाळवाडी ग्रामपंचायतने मिळविला आहे.
गटविकास अधिकारी यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये एक ते तिन उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. दरम्यान संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१९-२० च्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आयोजित केली होती. या अंतर्गत पाणी व स्वच्छतेमध्ये पुणे जिह्यातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींची पडताळणी करण्यात आली यामध्ये जिल्हास्तरीय गुणांकनुसार १३ तालुक्यातील एक जिल्हा परिषद गटनिहाय जास्तीत जास्त मिळालेल्या गुणांची पडताळणी करून ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. यामध्ये पहिला क्रमांक खेड तालुक्यातील कान्हेवाडी तर्फे चाकण या ग्रामपंचायतने पटकाविला आहे. तर दुसरा क्रमांक जुन्नर तालुक्यातील ठिकेकरवाडी आणि तिसरा क्रमांक इंदापूर तालुक्यातील सपकाळवाडी ग्रामपंचायतने मिळविला आहे. तर चौथ्या क्रमांकावर भोर तालुक्यातील ससेवाडी आणि पाचव्या क्रमांकावर शिरूर तालुक्यातील रांजणगाव – कारेगाव गटातील सोनेसांगवी हे गाव आहे.
दरम्यान प्रथम तीन ग्रामपंचायतचा सन्मान प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
Add Comment