ताज्या घडामोडी पुणे महाराष्ट्र

राज्यातील शाळांमध्ये पुन्हा वाजणार घंटा…

मुंबई (प्रतिनिधी): ओमीक्रोन व कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने राज्यातील शाळा (School) महाविद्यालये काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला होता… मात्र आता सोमवारपासून (दि 24 जानेवारी) शाळा (School) पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे.

शाळा सुरु करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री ठाकरेंना काल प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakare) यांनी शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण कमी आहेत, त्या ठिकाणी कोरोनासंबंधी सर्व नियम पाळून शाळा (School) उघडण्यात येतील, असे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटले आहे. यासंबंधी सर्व निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. हा निर्णय पहिली १ ते १२ च्या विद्यार्थ्यांबाबतही घेण्यात आला आहे. त्यामुळे २४ तारखेपासून आता शाळेची घंटा वाजणार आहे.

मुलांचे आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता ही आमची प्रथम जबाबदारी राहिली आहे. त्यामुळे पूर्णपणे स्थानिक प्रशासनाशी एकरूप राहून परिस्थितीचा आढावा घेण्यात यावा. आणि त्यानुसारच भविष्यातील निर्णय घेण्यात यावे, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यात पालकांची संमतीही महत्वाची असल्याचे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटले आहे. मात्र कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. मात्र निवासी शाळेबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्री-प्रायमरी शाळाही उघडणार
यावेळी पहिल्यांदाच प्री-प्रायमरी शाळाही उघडण्यात येणार असल्याची घोषणा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे. त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही आता शाळेची घंटा वाजणार आहे. अनेक संस्था, शाळा (School) तसेच पालकांनी शाळा उघडण्यात याव्या, अशा मागण्या केल्या होत्या. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakare) यांनी शाळा (School) सर्व नियम पाळून उघडण्यासाठी परवानगी दिली आहे.

error: Copying content is not allowed!!!