ताज्या घडामोडी प महाराष्ट्र महाराष्ट्र

न विचारता मजूर नेले म्हणून सारपंचांनी मारहाण केली.

सातारा |’मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले’ या कारणातून चिडून जाऊन सातारा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती असलेल्या महिला वनरक्षक सानप यांना बेदम मारहाण केली आहे.

 सातारा जिल्ह्यातील एका गावातून धक्कादायक ही घटना समोर आली आहे. माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने  एका गर्भवती वनरक्षक महिलेसह पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची संताजपनक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सातारा जिल्ह्यातील पळसवडे गावात ही घटना घडली आहे. माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही वनरक्षक महिला 3 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या आहेत तर डोक्यात दगड देखील मारल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. मारहाणीचा विडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!