ताज्या घडामोडी पुणे महाराष्ट्र

पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर रोज दहा हजारापेक्षा जास्त वाहने टोल भरत नाहीत; धक्कादायक माहिती.

मुंबई | नुकतीच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील डिसेंबर २०२१ महिन्याची आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून रोज दहा हजारांहून अधिक वाहने टोल न देता या महामार्गावरून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.

२०१६ साली मुख्य माहिती आयुक्तांनी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील सर्व टोल नाक्यांवरून रोज किती व कोणत्या प्रकारची वाहने जातात ती संख्या व टोलची रक्कम याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. नुकतीच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील डिसेंबर २०२१ महिन्याची आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून रोज दहा हजारांहून अधिक वाहने टोल न देता या महामार्गावरून प्रवास करत असल्याचे असल्याची बाब विवेक वेलणकर या सामाजिक कार्यकर्त्याने प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे शिवाय याची संपूर्ण चौकशी करण्याची देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये डिसेंबर २०२१ या पूर्ण महिन्यात एकूण ३,३०,७९७ वाहनांनी टोल न भरता या महामार्गावरून प्रवास केला आहे. यात exempt आणि violators अशा दोन कॅटेगरी मधील वाहने असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र यातील exempt किती व violators किती याचा तपशील मात्र जाणीवपूर्वक प्रसिद्ध केलेला नाही असं मत वेलणकर यांनी व्यक्त केले आहे. रोज दहा हजारांहून अधिक रुग्णवाहिका , पोलिस / मिलिटरी वाहने , आमदार / खासदार वगैरे या रस्त्यावर प्रवास करत असतील ही शक्यता शून्य आहे. आणि त्यातही १८५० बसेस , ५१९३ ट्रक , ५०८६ मल्टीऍक्सल , २०१९६ LCV या exempt category मध्ये असू शकत नाहीत. याचाच अर्थ रोज काही हजार वाहने टोल चुकवून ( violators) जातात . हे केवळ अशक्य आहे हे या रस्त्यावर प्रवास करणारे लहान पोर ही सांगू शकेल. त्यामुळे हे सगळंच संशयास्पद वाटते. मात्र कंत्राटदाराकडून आलेली ही आकडेवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करताना तेथील आधिकार्यांना यात काही वावगं वाटत नाही हे आश्चर्यकारक आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात वेलणकर यांनी नमूद केले आहे

error: Copying content is not allowed!!!