ताज्या घडामोडी पुणे महाराष्ट्र

दुचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका; आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २०: दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक विहित शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘जेवाय’(JY) मालिका सुरु करण्यात येत आहे. ज्यांना चारचाकी वाहनांना हवा असणारा आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) २४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या परिवहन विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती आणि आधारकार्डना जोडणी असलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकासह जमा करणे आवश्यक राहील.

ज्यांना दुचाकी मालिकेतील दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षित नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी २५ जानेवारी रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते दुपारी २.३० या दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.

चारचाकी वाहन क्रमांकाची यादी २५ जानेवारी रोजी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रकमेचा धनाकर्ष (डीडी) जमा करायचा असेल तर त्यांनी २५ जानेवारी रोजी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी ३.३० वाजता परिवहन विभागात लिलाव करण्यात येईल.

दुचाकी वाहन क्रमांकाची यादी २७ जानेवारी रोजी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येणार आहे. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रकमेचा धनाकर्ष जमा करायचा असेल तर त्यांनी २७ जानेवारी रोजी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी ३.३० वाजता परिवहन विभागात लिलाव करण्यात येईल.

धनाकर्ष ‘डेप्युटी आरटीओ पिंपरी चिंचवड’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक राहील. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा डीडी हा एकाच सीलबंद पाकीटासह जमा करावा.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे….

Add Comment

Click here to post a comment

error: Copying content is not allowed!!!