खोटी माहिती पसरवली तर तर तुमचे युट्युब चॅनेल आणि संकेतस्थळ बंद होऊ शकते.
दिल्ली | बातमी कोणतीही असो, ती प्रसारित करण्यागोदर प्रत्येक वृत्त संस्था त्या बातमीची शहानिशा करत असते.मात्र डिजिटल माध्यमातून कधी कधी खोटी माहिती पसरवण्यात येत असते.त्यामुळे जर तुम्ही खोटी माहिती पसरवली तर तुमचे युट्युब चॅनेल आणि संकेतस्थळ (वेबसाइट) बंद करण्यात येणार आहे, असा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतला आहे.
भारतविरोधी काही दिवसांपूर्वी खोट्या माहिती पसरवणाऱ्या 20 यूट्यूब चैनल व दोन संकेतस्थळ केंद्र सरकारने कारवाई केली होती. त्याच प्रमाणे बारभाषी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर खोटा प्रचार केला जात होता.तसेच भारतीय लष्कर, काश्मीर, राम मंदिर, जनरल बिपिन रावल यांच्या बाबतीत समाजात दुही पसरेल अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल केल्या जात होत्या. देशविरोधी कट असणार्यांवर कारवाई सुरूच राहणार असा इशारा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री ठाकूर यांनी दिला आहे.
यापुढे युट्युब चॅनेल आणि संकेतस्थळ चालक असणाऱ्या व्यक्तींना या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. चुकीची अथवा खोटी माहिती आपल्या युट्युब चॅनेल व संकेतस्थळावर पोस्ट करण्याच्या अगोदर ती माहिती योग्य आहे का? चुकीची तर नाही ना याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच ती पोस्ट करा अन्यथा कारवाई ला सामोरे जावे लागेल हे नक्की !
Add Comment