ताज्या घडामोडी देश पुणे महाराष्ट्र

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच

पुणे (प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीची लेखी परीक्षा चार मार्च ते चार एप्रिल या कालावधी मध्ये ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली…

या वर्षी दहावी च्या परिक्षे साठी 1625311 विद्यार्थ्यांनी तर बारावीच्या परीक्षेसाठी 1472562 विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंद केली असून इयत्ता दहावीची तोंडी परीक्षा 1 मार्च दरम्यान सुरू करण्यात येणार असून बारावीची तोंडी परीक्षा 20 फेब्रुवारी ला होणार आहे…. तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 फेब्रुवारी तर बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे…

विषय माध्यम व प्रश्नपत्रिका संख्या

मंडळाची परीक्षा सार्वत्रिक स्वरूपाची असून संपूर्ण राज्यात एकाच वेळी एकसमान प्रश्नपत्रिकेवर आयोजित केली जाते. यामध्ये वस्तुनिष्ठ लघुत्तरी व दिर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असतो. इ.12वी विषय 158, विज्ञान शाखा माध्यम 04, इतर शाखा माध्यम 06 प्रपत्रिका संख्या 356

इ.10 वी विषय 60 माध्यम 08, प्रश्नपत्रिका संख्या 158

https://fb.watch/aXdwIapDMh/

परीक्षेमध्ये असणार या घटकांचा सहभाग

दर परीक्षांसाठी प्रामुख्याने मुख्याध्यापक, प्राचार्य, केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परिक्षक, मुख्य नियामक, नियामक परीक्षक, लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच सर्व भरारी पथक यांचा असणार सहभाग

Add Comment

Click here to post a comment

error: Copying content is not allowed!!!