शिरूर, पुणे | शिरूर तालुका भाजपच्या दादा पाटील फराटे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या तालुका अध्यक्ष पदावर अखेर प्रदीप उर्फ आबासाहेब सोनवणे यांची वर्णी लागली आहे. याबाबत The बातमीने एक दिवस अगोदर “शिरूर तालुका भाजपमध्ये खलबते, नवीन तालुका अध्यक्ष ठरणार…?” आशा आशयाचे वृत्त प्रसारित करत आबासाहेब सोनवणे यांच्या निवडीबाबत तसे संकेत दिले होते. त्यानंतर आज (दि. २५) रोजी रिक्त झालेल्या शिरूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी आबासाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
आमदार बाबुराव पाचर्णे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आबासाहेब सोनवणे यांची ओळख आहे. निवडणुका, सभा, रॅली, या यंत्रणेत हिरहीरीने भाग घेणाऱ्या सोनवणे यांना आज अखेर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. यापूर्वी पक्षाच्या कुठल्याही पदावर कार्यरत नसताना स्वतःच्या गावची ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. त्याचबरोबर शिरूर तालुका खरेदीविक्री संघावर ऐतिहासिक निवड ही सोनवणे यांनी आणखी एक ओळख मानली जाते.
दरम्यान निवड झाल्यानंतर आबासाहेब सोनवणे यांनी The बातमीच्या प्रतिनीधीशी बोलताना, ज्याप्रकारे याअगोदर पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करत होतो त्यापेक्षा अधिक प्रमाणात पक्ष संघटनेसाठी वेळ देऊन वाडी, वस्तीवर पक्षाचे कार्य पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी विभागीय संघटनमंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, धर्मेंद्र खंडारे, राहुल पाचर्णे, संदीप भोंडवे, सुदर्शन चौधरी, शाम गावडे, माऊली बहिरट, कैलास सोनवणे, रोहित खैरे, संतोष करपे, गणेश कुटे, वैजंती चव्हाण, सुरज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
हे देखील वाचा…
Add Comment