ताज्या घडामोडी पुणे पुणे शहर महाराष्ट्र

जवानांची प्रयत्नांची पराकाष्ठा अन् मांजरीची अखेर सुखरुप सुटका

पुणे (प्रतिनिधी) : बुधवार (दि. 23) सकाळी आठ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात शुक्रवार पेठ, खडक पोलिस स्टेशन समोर सुंदर कॉर्नर या तीन मजली इमारतीच्या गच्चीवर एका तीस फुट टॉवरवर मांजर अडकल्याची वर्दि मिळाली होती. तसेच तिथे समोरच्या इमारतीत राहणारे जवान शफीक सय्यद यांनी ही घटना पाहिली व त्यांनीदेखील याची दखल घेत जवानांशी संपर्क साधला.

दलाचे जवान घटनास्थळी पोहचताच त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन शक्कल लढवत रश्शी व बास्केटचा वापर करण्याचा निर्णय घेतला. तसेच प्राणी पक्षांच्या बचाव पथकास देखील संपर्क साधला व लगेचच काम सुरू केले. दलाचे जवान व नुकतेच मा. राष्ट्रपती पुरस्कार विजेते चंद्रकांत आनंदास यांनी रश्शी व बास्केट घेत वर टॉवरवर जाऊन मांजराला खाली घेण्याचा प्रयत्न केला असता मांजर पुढे वर जाऊ लागले. आनंदास यांनी मांजराला बास्केटमधे घेण्याचा प्रयत्न केला पण तसे घडले नाही तर मांजराला हात लावून पकडत त्या भेदरलेल्या मांजराला आपलेसे करत खांद्यावर घेतले आणि अलगदपणे काळजी करत व धाडसाने त्या मांजरीला घेऊन खाली उतरले व मोहिम फत्ते केली.

यावेळी मांजराला पाळणारया कुटुंबाने जवानांचे कौतुक करत आनंद व्यक्त केला. या कामगिरीत वाहनचालक ईलाही शेख तसेच जवान चंद्रकांत आनंदास, राजेश कांबळे, अंबादास दराडे, महेंद्र कुलाळ, प्रतिक गिरमे, शफीक सय्यद यांनी सहभाग घेतला.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!