शिरूर, पुणे | करंदी (ता. शिरूर) येथील माध्यमिक शाळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनींना ५० मोफत सायकल वाटप करण्यात आले याशिवाय २० महिलांना सुखी कुटुंब किटचे वाटप रोटरी क्लब पुणे कॅम्पच्या वतीने करण्यात आले. त्याचबरोबर भाग शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळणी, प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी १००० क्षमतेचा पाणी फिल्टरचा प्लांट देखील उभारण्यात आला असल्याची माहिती रोटरी क्लब पुणे कॅम्पचे समन्वयक प्रदीप खेडकर यांनी दिली.
अनेक दिवसांपासून माध्यमिक विद्यालयातील आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनींना पायपीट करत शाळेत शिक्षण घेण्यासाठी यावे लागत होते. याची गरज ओळखून करंदी गावातील विकास दरेकर, अविनाश साकोरे, कांताराम नप्ते, शरद दरेकर, चंद्रकांत नप्ते, निलेश नप्ते, नितीन दरेकर, रमेश नप्ते यांनी प्रदीप खेडकर यांच्याकडे यासंदर्भात प्रस्ताव मांडला. त्याचसोबत नप्तेवस्ती भाग शाळेचे शिक्षक गणेश नप्ते यांनी मुलांसाठी खेळणी उपलब्ध व्हावी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार खेडकर यांनी प्राथमिक शाळेसाठी १००० लिटर क्षमतेचा पाणी फिल्टर प्लांट आणि वरील मागणीचा प्रस्ताव रोटरी क्लब पुणे कॅम्पशी संपर्क करून मांडला होता. त्याच अनुषंगाने रोटरी क्लबच्या पुणे विभागाचे प्रांतपाल पंकज शहा यांनी याला मंजुरी देत ५० सायकल उपलब्ध करुन दिल्या त्याचबरोबर २० गरजू महिलांसाठी सुखी कुटुंब किट देण्याचे देखील कबूल केले त्यानुसार आज (दि. २६ मार्च) रोजी या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांची बैलगाडीसह ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. वैभव झेंडे यांनी विद्यार्थी सहकाऱ्यांसह स्वागत गीत सादर केले. दरम्यान करंदी रोटरी क्लबच्या सचिवपदी अविनाश साकोरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लबचे प्रिया शहा, सदानंद नायक, सचिन परमार, वैशाली रावल यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते, कालवा सल्लागार समितीचे सदस्य राजेंद्र ढोकले, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दरेकर यांनी स्वागत केले, यावेळी ज्ञानेश्वर दरेकर, अशोक ढोकले, गोरक्ष ढोकले, कल्याण ढोकले, खंडू ढोकले, संतोष ढोकले, सुभाष ढोकले, बाळासाहेब ढोकले, पोपट नप्ते, संतोष दरेकर, बाळासाहेब ढमे, तात्यासाहेब ढोकले, भाऊसाहेब ढोकले, विकास ढोकले, संभाजी ढोकले, संभाजी खेडकर, वंदना साबळे, नवनाथ ढोकले, सोपान ढोकले, डॉ. नितीन सोनवणे, रवी नप्ते, सूर्यकांत दरेकर, विकास थिटे, संभाजी कंद्रुप, मच्छिंद्र ढोकले, ज्ञानेश्वर पिंगळे, शांताराम सोनवणे, अनिल नप्ते, अनिल कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन विकास दरेकर, क्रांती शहा यांनी केले तर आभार राघू नप्ते, मयूर गांधी यांनी मानले.
Add Comment