भोसरी, पुणे | बैलगाडा मालकांना आत्तापर्यंत बक्षीस म्हणून सोन्याची अंगठी, बैलगाडा, टीव्ही, फ्रिज, दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, जेसीबी यांसारखी बक्षिसे मिळाली आहेत. परंतु आता बैलगाडा मालकांना बक्षीस म्हणून महागडी चारचाकी गाडी म्हणजे मर्सिडीज गाडी बक्षीस म्हणून मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या भोसरी मतदार संघात आमदार महेश लांडगे यांनी भारावलेल्या बैलगाडा शर्यतीत याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
अनेक वर्षे बंद असलेली बैलगाडा शर्यत आता सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध भागात बैलगाडा शर्यतींचे आयोजन होत आहे. या बैलगाडा शर्यतीमध्ये लाखो रुपयांची बक्षिसे बैलगाडा मालकांसाठी देण्यात येत आहे. अशीच एक बैलगाडा शर्यत आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या मतदार संघात आयोजित केली होती यावेळी जेसीबी, चारचाकी बोलेरो गाडीसह दुचाकी देखील बक्षीस म्हणून देण्यात आल्या. दरम्यान यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी या बैलगाडा शर्यतीला हजेरी लावली माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या शर्यतीला भेट दिली.
दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील उपस्थिती लावत आमदार महेश लांडगे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे या बैलगाडा शर्यती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राणे यांनी भविष्यात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी पहिल्या क्रमांकाचे बक्षिस म्हणून स्वतः एक मर्सिडीज गाडी देणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट देखील घातली ती म्हणजे ज्या वर्षी देवेंद्र फडणवीस पुन्हा या राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होतील त्या वर्षी आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यती भरवल्या तर त्या शर्यतीसाठी बक्षीस म्हणून एक मर्सिडीज गाडी देणार असे नितेश राणे यांनी जाहीर केले.
Add Comment