शिक्रापूर, पुणे | देशातील नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पंधरवडा या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि मदतनीस यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा भाजप जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे आणि शिरुर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित खैरे यांनी तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आवर्जून हजेरी लावली यावेळी बोलत असताना वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ‘एकत्र लढा नाही तर वेगळं लढा तुमचं पानिपत ठरलेलं आहे’. अशा शब्दात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे तिनही पक्ष एकत्र मिळून लढले तरी, भाजप त्यांचा पराभव करेल आणि वेगवेगळे लढले तरी त्यांचा पराभव करणार असल्याचे सूतोवाच वाघ यांनी केले.
दरम्यान भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना ग्रामीण भागात काम करतना येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही कार्यकर्त्यांनी चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. दरम्यान आयोजक जयेश शिंदे यांनी प्रस्तावना करताना गेल्या आठ वर्षात केंद्र सरकारच्या विविध प्रकारच्या योजना त्याचबरोबर वैयक्तिक लाभाच्या योजना आणि गरीब कुटुंबातील रुग्णांना साडेतीन कोटीहुन अधिक रुपयांची मदत धर्मादाय आयुक्तांच्या वतीने मदत मिळवून दिल्याचे सांगितले.
दहा मिनिटं थांबायला वेळ नसताना मी एक तास थांबले – वाघ
गेल्यावेळी अहमदनगरला जाताना घाईत असताना मला दहा मिनिटे शिक्रापूरच्या कार्यालयात थांबण्याचा आग्रह जयेश शिंदे आणि रोहित खैरे यांनी केला. मात्र त्या कार्यालयात गेल्यानंतर मी एक तास थांबून माहिती घेतली आणि मला कौतुक वाटलं सर्वसामान्य माणसांसाठी किती ही पोरं झटतात. सरकारच्या योजनांची माहिती त्या कार्यालयात लावली होती. त्याचबरोबर आत्तापर्यंत केलेल्या कामांची व सर्व योजनांचे मार्गदर्शन करणारी टीम त्याठिकाणी उपलब्ध असल्याने याचा नागरिकांना फायदा होतोय हे पाहून चित्रा वाघ यांना आनंद वाटल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर ही बाब मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर घातली त्यांनी देखील कौतुक केले. अशाही बोलताना त्या म्हणाल्या.
यावेळी गणेश ताठे, संजय पाचंगे,डॉ. राजेंद्र ढमढेरे, विक्रम पाचुंदकर, विजय रणसिंग, सुरेश पलांडे, रवींद्र दोरगे, सुरेश भुजबळ, बाळासाहेब चव्हाण, राहुल गवारे, माऊली बहिरट, नवनाथ भुजबळ, प्रमिला दरेकर, रेश्मा शेख, वर्षाताई काळे, अनघा पाठक, मिनाक्षी ढमढरे, मोहिनी मांढरे, शालन राऊत, कोमल कातोरे, पंढाभाऊ गायकवाड, संतोष करपे, तुळशीदास दुंडे, बाबासाहेब दरेकर, अशोक हरगुडे, सुशीलभाऊ सैंदाणे, सुरज चव्हाण, पप्पू शेलार, रघुनंदन गवारे, नितीन गव्हाणे, श्रीकांतभाऊ सातपुते, रवी गव्हाणे, सागर ढमढेरे, उमेश झोरे, अमोल गवारे, पांडुरंग दरेकर, दिलीप शेलार, मोहन पांडे, दत्ता दरेकर, संदीप ढमढेरे, विलास आदक, रावसाहेब चव्हाण व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add Comment