Uncategorized

संजीव पलांडे यांची तुरूंगातून सुटका…!

शिरुर, पुणे | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांची देखील तुरुंगातून सुटका झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयने पलांडे यांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनाही जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (25 जानेवारी) पलांडे यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांची आज तुरुंगातून सुटका झाली आहे. संजीव पलांडे तब्बल दीड वर्षानंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!