ताज्या घडामोडी राजकीय शिरूर हवेली

गद्दारीचा शिक्का हा मेल्याशिवाय पुसत नाही : आमदार अशोक पवार

वडगाव रासाई ( ता. शिरूर ) : ‘आमच्या कुटुंबावर अनेक संकटे आली, मात्र आम्ही न डगमगता त्या संकटाना सामोरे जात पवार साहेबांसोबत आहोत. गद्दारीचा शिक्का हा मेल्याशिवाय पुसत नाही. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही पवार साहेबांसोबतच राहणार आहे’. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी वडगाव रासाई ( ता. शिरूर ) येथील प्रचार सभेत केले आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीत शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी आमदार पवार यांनी भाषण करताना तुफान फटकेबाजी केली आहे. अशोक पवार म्हणाले, ‘आमच्या कुटुंबावर अनेक संकटे आली, मात्र आम्ही न डगमगता त्या संकटाना सामोरे जात पवार साहेबांसोबत आहोत. गद्दारीचा शिक्का हा मेल्याशिवाय पुसत नाही. त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही पवार साहेबांसोबतच राहणार आहे. आपल्यावर संकटे येतात तेव्हा पवार साहेबच धाऊन येतात. अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात निधीची अडवणूक केल्याने विकास कामे रखडली. विरोधी उमेदवाराकडील सर्व लोक हे एमआयडिसी माफिया,सॅंड व लँड माफिया आहेत.तुम्ही त्यांना निवडुन देणार आहात का.सरकार आल्यानंतर शिरूर हवेलीतील दोन्ही साखर कारखाने सुरू करावेत तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी. या औद्योगिक वसाहतीमध्ये पक्षाच्या जोरावर अनेकांनी आपले बस्तान बसवले. पदे मिळवली आणि हीच मलिदा गॅंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार पाडायला एक झाली असल्याचे अशोक पवार बोलले आहेत. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षासह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे स्टार प्रचारक उत्तम जानकर, प्रवक्ते विकास लवांडे, वकील हेमा पिंपळे यांसह अनेक स्थानिक नेत्यांनी भाषणे केली.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!