जुन्नर ( प्रतिनिधी ) : तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या . मात्र याबाबत सर्वच पक्षीय उमेदवारांचा आणी त्याच्या कार्यकर्त्यांचा प्रत्येक गाव पातळीवर ” आथिर्क सेटीग ..? आणि नियोजन कुठे व कशाप्रकारे लावायच्या ? याबाबत मोठ्याप्रमाणात चर्चा होऊ लागल्या आहेत. या विधानसभा निवडणुकीत एकुण अकरा उमेदवार उभे असुन सर्वाचा ” जीव ” मात्र टांगणीला लागला आहे.
जुन्नर तालुक्यात खरेतर आतापर्यंत राष्ट्रवादीचे इथुन मागील काळात वर्चस्व राहिले आहे. मात्र राष्ट्रवादीतच दोन गट पडल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची व्दिधा मनस्थिती झाली आहे. तीच नेमकी अवस्था शिवसेनेची झाली आहे. या गोंधळामुळे मात्र जुन्नर तालुक्यातील मतदार राजाची पण ” नेमका कोणता झेंडा घेऊ हाती ? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील विधान सभेची निवडणुक हि कुणीही आधिक मताधिक्याने जिंकेल ? अशी तरी शक्यता दिसुन येत आहे. त्यामुळेच तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती व महाविकास आघाडी यांच्याबरोबरच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे जुन्नरात पंचरंगी लढत होत आहे. महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर, शिवसेना शिंदे गटाचे व माजी आमदार शरद सोनवणे यांच्याबरोबरच भाजपच्या नेत्या आशाताई बुचके हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच आदिवासी नेते देवराम लांडे यांचं प्रामुख्याने मतदारसंघात वादळ घोंघावत आहे. आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातील शरद लेंडे, मोहित ढमाले, अंकुश आमले, तुषार थोरात तसेच शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना उघड उघड उमेदवारी द्यायला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झाला होता. मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहेत.परंतु आघाडीचा धर्म पाळत शेरकर यांना मतात आघाडी मिळणार का हे देखील महत्त्वाचं असणार आहे.
खरी चुरस शरद पवार गटाचे उमेदवार सत्यशील शेरकर विरुध्द राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अतुल बेनके व अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनावणे यांच्यात रंगणार आहे. मात्र यामध्ये निवडणूकीच्या रिंगणात इतर उभे असणारे अपक्ष उमेदवार कोणाची किती मते खाणार ? यावर बहुतांशी सर्वाचे भवितव्य अवलंबून असणार आहे हे मात्र निश्चित…!
Add Comment