मुंबई : राज्यामध्ये भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल जनता दल ( सेक्युलर ) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथील सागर बंगल्यावर भेट घेऊन अभिनंदन केले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनता दलासह महायुतीतील इतर घटक पक्षांच्या प्रमुखांनी भेट घेतली.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सर्वच ठिकाणाहून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्यातील असलेल्या घटक पक्षाचे नेते देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा देत आहेत. अशातच जनता दल ( सेक्युलर ) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाथा शेवाळे यांनी देखील मुंबईत फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या विजयाबद्दल महायुतीतील घटक पक्षांचे आभार मानले आहे.
यावेळी शेवाळे आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली आणि त्यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यावर सरकारमध्ये सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी यांना सन्मानाची वागणूक भेटेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखांना दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात भाजप आणि घटक पक्ष यांच्यात असणारी युती आणखी घट्ट होणार आहे, यात तिळमात्र शंका नाही.
Add Comment