मुंबई ( २७ नोव्हें. ) : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने अवघ्या १५०० मतांनी राष्ट्रवादी ( अजित पवार ) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ यंदा रंगतदार झाली आहे. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असून पुणे जिल्ह्यात बारामती नंतर आंबेगाव विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. याच कारण म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील विरुध्द राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) काँग्रेस पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम अशी लढत रंगली होती. निकम यांच्या प्रचारार्थ आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील मंचर येथे निवडणुकीच्या दरम्यान शरद पवार यांनी वळसे पाटील यांना ‘पाडा पाडा पाडा’ असे मतदारांना आवाहन केले होते. मात्र १५०० मतदारापर्यंत हे आवाहन पोहोचले नाही आणि अगदी तेवढ्याच मतांनी वळसे पाटील निवडून आले आहे.
मात्र पवारांचा कोणताही मनात राग न ठेवता वळसे पाटील यांनी आदराने शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान कोणती राजकीय चर्चा झाली असेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वळसे पाटील यांनी शरद पवारांना सोबत येण्यासाठी आग्रह धरला असावा किंवा महाविकास आघाडीच्या झालेल्या पराभवाबाबत चर्चा झाली असावी. मात्र नक्की कोणती चर्चा झाली ? का राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र यावी यासाठी अजित पवारांनी वळसे पाटील यांना शरद पवारांकडे पाठवून त्यांची मनधरणी केली असावी का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र कोणती चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
मतदारसंघात भरपूर प्रश्न मात्र चर्चा काय बोगदा….! आता आंबेगावचे वळसे पाटील यांना पुन्हा मंत्री पदाची संधी मिळणार आणि निवडणूक काळात गाजलेला मुद्दा म्हणजे डिंभे धरणाच्या बोगद्याच्या मुद्द्याचं पुढे काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Add Comment