ताज्या घडामोडी शिरूर

पिंपळे जगताप ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पाठपुरावा

शिक्रापूर | पिंपळे जगताप येथील ग्रामस्थांनी भारत गॅस कंपनी ते करंदी आणि एल अँड टी फाटा ते करंदी फाटा अशा दोन्ही रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रशासनाच्या विरोधात विधानसभा निवडणुकीपूर्वी साखळी उपोषण केले होते. याची दखल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतली आहे. पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि औद्योगिक वाहतूकिसाठी मिसिंग लिंक तयार करण्यात आल्या आहेत. या नुकतीच या रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे, याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

दरम्यान सणसवाडी ते पिंपळे जगतापला अर्थात चाकण – शिक्रापूर रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याला ७९ कोटी ८ लाख आणि तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा ते पुढे पिंपळे जगताप, करंदी फाटा या रस्त्याला तब्बल ११५ कोटी रुपयांचा अपेक्षित निधी वापरला जाणारा आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून हा रस्ता बनविला जाणार आहे. यामुळे चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील त्याचबरोबर शिक्रापूर येथील वाहतूक कोंडी आणि पुणे ते अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला देखील या रस्त्यामुळे दिलासा मिळणार आहे.

दरम्यान पिंपळे जगताप, करंदी, सणसवाडी या हद्दीतील असलेल्या औद्योगिक कारखान्यांच्या वाहतुकीला देखील या मोठा फायदा होणार आहे. या भागात असलेल्या अनेक कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी देखील यापूर्वी या रस्त्याबाबत खासदार डॉ अमोल कोल्हे यांची भेट घेतली होती. पिंपळे जगताप ग्रामस्थांनी याबाबत सातत्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

दरम्यान या रस्त्याबाबत पिंपळे जगताप येथील ग्रामस्थ श्रीपाद जगताप, अरुण जगताप, शाम बेंडभर, सुभाष जगताप, शरद जगताप यांनी साखळी उपोषण केल्यानंतर प्रशासनाला जाग आली त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पुढाऱ्यांनी या आंदोलनाला भेट दिली होती. या आंदोलनामुळे दोन्ही रस्त्याची सुधारणा होणार असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRD) आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे स्थानिक ग्रामस्थांनी आभार मानले आहे.

अनेक वाहनांना या रस्त्यावरून मोठा त्रास सहन करावा लागत होता, रस्ता होतोय ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पिंपळे जगताप ग्रामस्थांनी एकत्र येऊन आंदोलन केले, करंदी, जातेगाव, सणसवाडी ग्रामस्थांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा होता त्या सर्वांचे आभार” – श्रीपाद जगताप (आंदोलक)

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!