क्राईम ताज्या घडामोडी

विहीरीत आढळले अनोळखी तरुणाचे प्रेत – रांजणगाव एमआयडीसी परिसरात खळबळ !

शिरूर : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील गट नंबर ५०१ येथील विहीरीत एका अनोळखी तरुणाचे सडलेले प्रेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर तरुणाचे वय अंदाजे २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेश काळुराम मलगुंडे (वय २८, रा. मलगुंडे वस्ती, ढोक सांगवी, ता. शिरूर) हे त्यांच्या शेतातील विहीरीवरील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहीरीत एक इसम उताण्या स्थितीत मृतावस्थेत तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ पोलीस पाटील दीपक मलगुंडे यांना याची माहिती दिली. पोलीस पाटलांनी याची खबर रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला देण्यास सांगितले.पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत फायर ब्रिगेडच्या मदतीने मृतदेह विहीरीबाहेर काढला. सदर प्रेत सडलेले असून मृताच्या चेहऱ्यावर जलचर प्राण्यांनी चावा घेतल्याचे दिसून आले. हातापायांचे तळवे पाण्यामुळे पांढरे झालेले होते. मृताच्या अंगात फिकट जांभळ्या रंगाचा फुलबाह्याचा शर्ट, निळ्या रंगाची कलर गेलेली जीन्स पॅन्ट (नाडीने कंबरेस बांधलेली) व आतील कपड्यांमध्ये काळ्या रंगाची ‘जॉकी’ कंपनीची अंडरवेअर आढळली आहे. डोक्यावर टक्कल असून दाढी-मिशा नव्हत्या.

पोलीस अधिक तपास करत असून मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!