Uncategorized क्राईम ताज्या घडामोडी पुणे शिरूर

रस्त्यात अडवून लूट करणारी टोळी गजाआड; पोलिसांची झटपट कामगिरी !

शिरूर : रांजणगाव एमआयडीसी परिसरात कामगारांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. अशातच रस्त्यात अडवणूक करून लुटणाऱ्या टोळीला दोन तासात जेरबंद करण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. तीन आरोपींकडून लूट केलेला मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन हहितील रांजणगाव एमआयडीसी मध्ये दि. 14/01/2026 रोजी सायंकाळच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरा समोरुन सुरेश मलाबाई पारगील ( रा. पाचामोडी ता सांगावाडा जि म्हैसाघर राज्य गुजरात ) हे पायी जात असताना तीन आज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरुन येऊन त्यांना रोडवर आडवुन शिवीगाळ दमदाटी करुन त्यांचे जवळील 9000 रु किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन घेऊन पळून गेल्याची घटना घडली होती.याप्रकरणी फिर्यादी यांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.रांजणगाव एमआयडीसी पोलीस तपास पथकाने तात्काळ सूत्रे फिरवली. अवघ्या दोन तासात 3 आरोपींना ताब्यात घेण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला यश आले. सदर आरोपींकडुन गुन्ह्यातील चोरी गेलेले मोबाईल व्यतिरीक्त इतर 5 मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी निलेश चंद्रकांत पवार ( वय 28 वर्षे रा. भोंद्रे कान्डुर ता पारनेर जि अहिल्यानगर ), मोहन विठ्ठल भोगे ( वय 28 वर्षे रा. प्रितम प्रकाशनगर शिरुर जि पुणे), अभिजीत चंद्रकांत पवार ( वय- 35 रा. हिवरगावपठार ता संगमणेर जि पुणे ) यांना अटक केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक संदिपसिंह मिल्ल, रमेश चोपडे अप्पर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, प्रशांत ढोले, उपविभागिय पोलीस अधिकारी शिरुर विभाग शिरुर, यांचे मार्गदर्शनाखाली महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरिक्षक अविनाश थोरात, सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, संदिप भांड यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. फौज. शिंदे व पोलीस हवालदार सरजीने हे करीत आहे.

error: Copying content is not allowed!!!