ताज्या घडामोडी पुणे महाराष्ट्र राजकीय

अजितदादा आणि ‘६’ चा योग : आयुष्यभर साथ दिलेला अंक, अंतापर्यंत !

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे नेते अजितदादा पवार यांच्या आयुष्यात ‘६’ हा अंक केवळ योगायोग नसून त्यांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग होता, असं म्हणावं लागेल.

अजितदादा पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी झाला. २८ जानेवारी २०२६ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आजच्या दिवशी अजित दादांचे वय नेमके ६६ वर्षे, ६ महिने आणि ६ दिवस इतके होते. विशेष म्हणजे, दादा यांनी उपमुख्यमंत्री पदाची ६ वेळ शपथ देखील घेतली होती. त्यांच्या दैनंदिन दिनक्रमातही ‘६’ या अंकाला अनन्यसाधारण महत्त्व होते.

त्याचबरोबर केवळ पवार आडनाव असलेल्या कुटुंबातील सहा सदस्य कुटुंबातील निवडणुकीच्या रिंगणात देखील पाहायला मिळाले. सक्रिय राजकारणात त्यांचा सहभाग दिसून येतो. त्यामध्ये काका शरद पवार, स्वतः अजित दादा, पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार, पुतण्या रोहित पवार आणि दुसरा पुतण्या योगेंद्र पवार आहेत.

दररोज सकाळी नेमके ६ वाजता अजितदादा घराबाहेर पडत असत. लोकांचे सुख-दुःख, समस्या, विकासकामे यांची माहिती घेण्यासाठी ते पहाटेच नागरिकांच्या समसमस्या सोडवण्यासाठी पोहोचत होते. अनेक नागरिक आजही सांगतात की, “दादा सकाळी ६ वाजताच आमच्या येथे हजर असायचे.”

राजकारणाला वेळेची शिस्त, लोकांशी थेट संवाद आणि कामात सातत्य कसं असावं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे अजितदादा पवार. त्यांच्या आयुष्यातील ‘६’ हा अंक त्यांच्या कार्यशैलीशी, वयाशी आणि जनतेशी असलेल्या नात्याशी विलक्षणरीत्या जोडलेला दिसतो.

म्हणूनच आज अनेक कार्यकर्ते आणि समर्थक म्हणतात की, ‘६’ हा अंक अजितदादांच्या जीवनाचा केवळ आकडा नव्हता, तर तो त्यांच्या जनसेवेचं प्रतीक होता.

Add Comment

Click here to post a comment

Featured

error: Copying content is not allowed!!!