रांजणगाव : शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती येथील गणेगाव रोडवरील संकल्प सिटी परिसरात एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली होती. या कारवाईत प्रशांत फक्कड मावळे (वय २४, रा. रांजणगाव गणपती, मूळ रा. मलठण ) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३४ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थ, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व इतर साहित्य असा एकूण ६.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीत आरोपीने हा अंमली पदार्थ विकास दातीर (रा. माळीवाडी, सोनगाव, ता. राहुरी) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली असून त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पो.नि. महादेव वाघमोडे, स्था.गु.शा.चे सपोनि कुलदीप संकपाळ, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोसई अविनाश थोरात स्था.गु.शा. चे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजु जाधव, राजु मोमीन, सागर धुमाळ, राहुल पवार रांजणगाव पोलीस स्टेशनचे अंमलदार विलास आंबेकर, किशोर शिवणकर, अमोल रासकर यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई अविनाश थोरात, रांजणगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत.











Add Comment